उंबर्ले नळपाणी योजनेला विद्युत प्रवाह कमी दाबाने मिळत असल्याने गावाला दररोज पाणी पुरवठा करणे अशक्य
उंबर्ले येथील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेला विद्युत प्रवाह कमी दाबाने मिळत असल्याने योजनेचा वीज पंप व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला दररोज पाणी पुरवठा करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पाणी योजना असूनही ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत.या सगळ्या विरोधात ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. १ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण न झाल्यास संपूर्ण उंबर्ले गावाने आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दापोली तालुक्यातील महावितरणच्या कारभाराचा फटका उंबर्ले नळपाणी पुरवठा योजनेला बसला आहे. कमी जास्त विद्युत दाबामुळे पंप व पॅनलमध्ये सततचा बिघाड होत असल्याने न.पा.पु. योजनेचा देखभाल दुरूस्तीचा खर्च वाढतो पर्यायाने न.पा.पु. योजनेचा एकूण खर्च वाढतो तसेच नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ व महिला यांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. www.konkantoday.com