अधिवेशन काळात आमदार राजन साळवी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात गेले आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जयगड (ता. रत्नागिरी) येथील किल्ल्याचा बुरुज आणि तटाला या भागात हाेणाऱ्या कंपनीच्या ड्रेझिंगमुळे तडे गेले आहेत. या प्रकाराची दखल प्रशासनाने घेऊन तहसीलदार तसेच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पाहणी तटाला व बुरुजाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनीही जयगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत त्यांनी किल्ल्याच्या दुरावस्थेबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडू असे सांगितले.अधिवेशन काळात आमदार राजन साळवी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात गेले आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. आमदार साळवी नेमके कशासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला गेले याची चर्चा रंगू लागली. आमदार साळवी दालनातून बाहेर येईपर्यंत तर्कवितर्क लढविले जात हाेते. बऱ्याच वेळाने आमदार साळवी दालनाबाहेर आले आणि त्यांनी जयगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी ही भेट घेतल्याचे समाेर आले. त्यानंतर रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.www.konkantoday.com