
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीवर कोणाचा दावा असणार हे लवकरच स्पष्ट होणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. या मतदरसंघाचा दावेदार कोण, हे गुरुवारी (ता.२९) प्रसिद्ध होणाऱ्या महायुतीच्या पहिल्या यादीमध्ये स्पष्ट होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने विद्यमान खासदार विनायक राऊत हेच उमेदवार असल्याचे निश्चित झाले आहे. आता प्रतीक्षा आहे ती महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची. या मतदारसंघासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची भाजपकडून तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्या नावांची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय हालचालींना वेग येताना आहे. विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी-रायगड या मतदारसंघाकडे विशेष लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचे आहे.www.konkantoday.com