
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चिपळूण येथे उड्डाणपूल बांधताना गर्डर कोसळले होते. हा अनुभव लक्षात घेऊन संगमेश्वर येथील सोनवी नदीवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलासाठीच्या गर्डरचे ऑन साईड कास्टिंग म्हणजेच पिलरवरच गर्डर बांधणीचे काम केले जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही कमी झाला असून, वाहतूक खर्चाची बचत होणार आहे.चिपळूण शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कळंबस्तेपासून युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी उभे करण्यात आलेल्या दोन पीलरमध्ये ४० मीटरचे अंतर आहे. तेथे लागणारे गर्डर प्रिकास्ट करून बसवले जात होते. कामथे येथे कंपनीच्या आवारात गर्डर तयार केले होते. त्यानंतर ते चिपळुणात आणून आधुनिक पद्धतीने लॉंचरच्या साह्याने पिलरवर बसवले गेले. दोन महिन्यापूर्वी त्यातील काही गर्डर कोसळले. चिपळूणमध्ये गर्डर कोसळण्याची घटना लक्षात घेऊन ठेकेदार कंपनीने संगमेश्वर येथील सोनवी नदीवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी गर्डरचे ऑन साईड कास्टिंग सुरू केले आहे. येथे जुन्या रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे दोन उड्डाणपूल उभारले जात आहेत. या पुलाची लांबी १५५ मीटर आहे. या पुलासाठी सात पिलर उभारण्यात आले आहेत.www.konkantoday.com