
भाजप आमदार नितेश राणेंविरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी चौकशीची मागणी; सर न्यायाधीशांना लिहिले पत्र
मुंबई – गोवंडी येथे जनआक्रोश मोर्चा दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. नितेश राणेंच्या वक्तव्या प्रकरणी मुंबईतील वकिलांनी व विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सर न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. राणेंच्या द्वेश युक्त भाषणाची सर्वोच्च न्यायालयाने सुओमोटो दखल घ्यावी तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.गोवंडी येथे काही दिवसांपूर्वी जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाषण करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजबाबत द्वेषयुक्त भाषण केले होते. मुस्लिमांची घरे, दुकाने आणि मशिदी पालिकेने जमीनदोस्त कराव्यात तसेच मुस्लिम हे हिरवे साप असल्याचे त्यांनी म्हटले होते. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राणे यांच्या प्रक्षोभक भाषणानंतर पोलिसांनी सुद्धा कोणतीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.आमदार राणे यांच्या भाषणामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतः हुन दखल घ्यावी म्हणुन गोवंडीतील वकिलांनी व विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशाना पत्र लिहिले आहे. www.konkantody.com