परप्रांतीय मिरची व्यापार्यांच्या कारवाईनंतरही दुसर्या दिवशी मिरची विक्रीचा प्रयत्न
गेल्या महिनाभरापासून चिपळूण शहरातील विविध भागात मिरची विक्री करणार्या परप्रांतीय व्यावसायिकांवर सोमवारी नगर परिषदेने कारवाई केली. त्यांच्याकडून ८०० किलो मिरच्या जप्त करण्यात आल्या आहेत. तरीही हे व्यावसायिक मंगळवारी महामार्गावर व्यवसाय करीत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथक गेले असता त्यांनी हुज्जत घातली. यातून कर्मचार्याने एकाला मारहाण केल्याचे वृत्त असून त्यानंतर व्यावसायिक पळून गेले.शहर व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत ठिकठिकाणी परप्रांतीय व्यावसायिकांनी मिरचीचा बाजार थाटला होता. यामध्ये महिला व्यावसायिकांची संख्या अधिक होती. ही मिरची अवघ्या दोनशे रुपये किलो दराने विकली जात होती. हा दर बाजारभावापेक्षा निम्मा असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत होते.www.konkantoday.com