नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली.
नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा अवघ्या चार पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी सदर जत्रोत्सव शनिवार दिनांक २ मार्च रोजी होत आहे.यादिवशी पहाटे ३ वाजल्या पासून एकूण ९ दर्शन रांगाद्वारे भाविकांना आई भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी काम चालू आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून विविध व्यावसाईकांची आंगणेवाडी मध्ये लगबग वाढल्याचे दिसून येत आहे.जसजशी दुकाने सजायला लागली, तसतसा आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. सामाजिक संस्था व विविध पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.www.konkantoday.com