दापोली तालुक्यातील सातांबा, सुकोंडी, चांदीवणे परिसरात वणवा लागून शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
दापोली तालुक्यातील सातांबा, सुकोंडी, चांदीवणे परिसरात वणवा लागून शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर कृषी विभागाकडून परिसराची प्राथमिक पाहणी करण्यात आली. देहेण परिसरात लागलेल्या आगीचे वेगवान वार्यामुळे वणव्यात रूपांतर झाले. या वणव्यात सातांबा, सुकोंडी, चांदीवणे आदी परिसरातील आंबा, काजूच्या झाडांसह इतर वनसंपदा जळून खाक झाली. ही जाग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. शनिवारी दुपारच्या सुमारास देहेण तळवाडी येथे आग लागली होती. उन्हामुळे गवत सुकलेले असल्याने व लाकडेही सुकी असल्याने आणि त्यात वारा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र यात स्थानिक बागायतदार, शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आधीची माहिती मिळताच परिसराची कृषी विभागाकडून पाहणी करण्यात आली. www.konkantoday.com