*मोबाईल वरून वाद, पतीच्या मारहाणीत पत्नीच्या डोक्याला दुखापत*
___पतीने पत्नीला केलेल्या मारहाणीत पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी सावर्डे-भुवडवाडी येथे घडली. किरकोळ कारणातून हा वाद झाला असून याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीवर सावर्डे पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. गोविंद मोहन जाधव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गोविंद जाधव याने त्याच्या पत्नीचा मोबाईल घेतला होता. तो मोबाईल मुलांनी आईला मागण्यास सांगितला असता गोविंद याला राग आला. त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच पत्नीसह मुलांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मुलांना हात लावायचा नाही, असे पत्नीने पतीला बोलल्यावर याच रागाने गोविंद याने रागाने जळावासाठी आणलेल्या पट्टीपैकी एक पट्टी हातात घेवून पत्नीच्या डोक्यात मारली. यात पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांनी रूग्णालयात उपचार घेतले असून या प्रकरणी त्यांनी सावर्डे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पती गोविंद जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com