*मनोज जरांगेंच्या अडचणींत वाढ; दोन ठिकाणी गुन्हे दाखल*,
_अंतरवाली सराटीमध्ये सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी विना परवाना रास्ता रोको आंदोलन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यातील तब्बल १,०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. जरांगे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.www.konkantoday.com