अॅग्रो टूरिझम’ च्या माध्यमातून ‘स्पाइस गार्डन’ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे-अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार*
*____ ‘अॅग्रो टूरिझम’ च्या माध्यमातून ‘स्पाइस गार्डन’ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे.पाणी फाऊंडेशन सारख्या उत्कृष्ट प्रतीच्या शेतीशाळा झाल्या पाहिजेत. भाटे संशोधन केंद्राने विकसित केलेली लाखी बाग शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आंतरराष्ट्रीय पाैष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मिलेट नाचणी-वरी पिकाचे ‘क्लस्टर प्रोजेक्ट’ प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी ‘मिलेट मॅपिंग’ करावे. तसेच क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करण्याची सूचना कृषि व पदुम विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केली.रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी विविध कृषि योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी उत्पादन वाढीबाबत सूचना केल्या. बैठकीनंतर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, संशोधन केंद्र शिरगांव, मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथे भेट देवून नवीन संशोधनाबाबत माहिती घेतली.www.konkantoday.com