मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांच्या उत्तम कामगिरीचा पालकमंत्र्यांनी केला गौरव
गेल्या दोन वर्षात प्रशासक असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज अतिशय सुंदररित्या सुरू असल्याचे मत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांच्या उत्तम कामगिरीचा पालकमंत्र्यांनी गौरव केला.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इस्त्रो, नासामध्ये पाठविण्याचे अभियान मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सुरू केले आहे. सौरऊर्जा प्रकल्प राबविला जात आहे. आज रत्नागिरी पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविता येणे शक्य आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना अधूनमधून अधिकार्यांशी कटुता घ्यावी लागते. ९९ टक्के अधिकारी, कर्मचारी चांगले काम करीत आहेत. एक टक्के कर्मचारी उर्वरितांना बदनाम करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सन २०१० पासून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण आवर्जुन उपस्थित राहत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
www.konkantoday.com