*राजापूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांची तयारी सुरू*
___विविध कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या राजापूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या २२ जागांसाठी पोटनिवडणुका आणि वर्षभराच्या कालावधीमध्ये मुदत संपत असलेल्या आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनाने सुरू केली आहे.याबाबत बुधवारी (ता. १४) प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. २० फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करायच्या असून, २३ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.तालुक्यातील संभाव्य सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १७ ग्रामपंचायतींच्या २२ जागा गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे रिक्त आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये कणेरी, शेढे, कोंड्येतर्फ राजापूर, भू, तेरवण, खिणगिणी, दसूर, पेंडखळे या गावांचा समावेश आहेwww.konkantoday.com