*गणेशगुळे समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडले कासव*_
________रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्र किनाऱ्यावर ३० किलो वजनाचे मृत कासव सापडले.ग्रामस्थांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या ग्रामस्थांना हे मृतावस्थेतील कासव दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसपाटील संतोष लाड यांना दिली. त्यांनी पोलिस अंमलदारांना कळवले. त्यानंतर कासवाला ग्रामस्थांनी एक खड्डा खणून त्यामध्ये पुरले. हे कासव सुमारे ३० किलोपेक्षा जास्त वजनाचे होते. त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजू शकलेले नाही. www.konkantoday.com