*तलाठी भरतीच्या बायोमेट्रीक व्हेरीफिकेशनसाठी राज्यातून आलेल्या ३५० उमेदवारांची टीसीएस एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रचंड फरफट*

_तलाठी भरतीच्या बायोमेट्रीक व्हेरीफिकेशनसाठी राज्यातून आलेल्या ३५० उमेदवारांची टीसीएस एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रचंड फरफट झाली. येथील अल्पबचत कार्यालयात ही प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी टीसीएस ही एजन्सी नेमली होती. काही तांत्रित अडचणीमुळे त्यांचे युनिट आलेच नाही. सकाळी १० ची प्रक्रियेसाठी राज्यातून आलेले उमेदवार ८ तास ताटकळुन होते. त्यामुळे उमेदवारांचे प्रचंड हाल आणि संताप झाला होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापूर येथून हे युनिट आले नव्हते.राज्यातून आलेल्या आम्हा उमेदवारांची प्रशासनाने चेष्टा केल्याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी दिली.काही महिन्यांपुर्वी झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत निवड झालेल्या 350 उमेदवारांचेजिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहामध्ये बायोमेट्रीक व्हेरिफिकेशन प्रक्रिया होती. सकाळी 10 वाजता ही प्रक्रिया होणार असल्याने राज्यातील उस्मानाबाद, यवतमाळ, जालना, बिड, येथून उमेदवार आले होते. जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांचाही यामध्ये समावेश होता.राज्यभरात झालेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी जिह्यातुन तब्बल 36 हजार 817 परीक्षार्थींनी या पदभरतीसाठी अर्ज केला होता. यापैकी रत्नागिरी जिल्यातुन अर्ज केलेले 350 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये यवतमाळ, जालना, बिड, याभागातील सर्वाधिक उमेदवार आहेत. उमेदवारांचे दाखले तसेच इतर कागदपत्रांचे 2 फेबुवारी 2024 ला जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात तपासणी झाली. त्यानंतर काल (ता.13) या उमेदवारांचे बायोमेट्रीक व्हेरीफीकेशन करण्यात येणार होते.त्यासाठी सकाळी १० वाजता त्यांना बोलावण्यात आले. टीसीएस एजन्सीकडुन हे व्हिरीफिकेशन होते. मात्र १० वाजता होणारे व्हेरिफिकेशन तांत्रिक कारणामुळे ४ होईल, असे सांगितले. परजिल्ह्यातून सकाळी लवकर आलेले काही उमेदवार अक्षरशः अल्पबचत सभागृहात कंठाळुन झोपुन गेले. तर काहींचा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत संताप होत होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button