
सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी अजित यशवंतराव यांची निवड*
*___सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी लांजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यशवंतराव यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल अजित यशवंतराव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गेल्या काही वर्षांपासून लांजा येथील अजित यशवंतराव सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील महत्त्वाची सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. याचीच दखल घेऊन शासनाने अजित यशवंतराव यांच्यावर सिंदूर रत्न समृद्ध योजनेच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती केली आहे.यापूर्वी सिंधुदुर्गमधील प्रमोद जठार व रत्नागिरी येथील उद्योजक किरण सामंत यांची वर्णी लागली आहे. आता अजित यशवंतराव यांची निवड झाली आहे.www.konkantoday.com