*जरांगेनं मोदी येतील तेव्हा जागेवरुन हलून दाखवावं-**नारायण राणे यांचं आव्हान*
__मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.तुम्हाला मराठे इतके सोपे वाटतात का? असा सवाल विचारत नुसती नाटकं सुरु असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांचे घोटाळे मागे घेतले. पण मराठा आरक्षणाबाबत प्रक्रियाच सुरु आहे. तुम्हाला राज्य शांत बघायचं नाहीए का असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आपला जीव गेला तर महाराष्ट्राची लंका होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठ्यांना फसवत आहेत. मराठ्यांना फसवणाऱ्यांचा हिशेब होणार, असं सांगतानाच, मराठ्यांविरोधात भुजबळांना अजित पवारांचं बळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय.नारायण राणे यांचं आव्हानमनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आव्हान दिलं आहे. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, म्हणणाऱ्या जरांगेनं मोदी येतील तेव्हा जागेवरुन हलून दाखवावं, असं आव्हान राणेंनी दिलंय, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल, आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असं नारायण राणेंनी म्हटलंयwww.konkantoday.com