*सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरीत महिला उद्योजिकांसाठी विशेष बैठक*

__रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणारी नियमित बैठक महिला विशेष म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या संक्रांत सणाचे औचित्य साधून यावेळच्या बैठकीनंतर उद्योजिकांकरिता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत या संकल्पनेवर कार्य करणारी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही मराठी व्यावसायिकांची नोंदणीकृत संस्था आहे. भारतातील सुप्रसिद्ध ब्रिज इंजिनिअर माधवराव भिडे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थात्मक चळवळीची स्थापना २००० साली केली. मराठी माणसाची व्यावसायिकतेबद्दलची मानसिकता बदलून त्यांनी परस्पर सहकार्याने श्रीमंत व एकसंघ जागतिक महाराष्ट्रीय व्यावसायिक समाजाची उभारणी करावी, या उद्देशाने त्यांनी ही संस्था स्थापन केली. आता राज्यात सॅटर्डे क्लबचे रत्नागिरीसह ९५ चाप्टर्स कार्यरत आहेत. व्यावसायिकांना मार्गदर्शन व परस्पर सहकार्याच्या माध्यमातून व्यवसायवृद्धीसाठी सॅटर्डे क्लबच्या विश्वस्त मंडळाचे सभासद आणि चाप्टरचे पदाधिकारी सतत प्रयत्नशील असतात. यातूनच या संघटनेची दमदार वाटचाल सुरू आहे.महिला उद्योजिकांसाठी सॅटर्डे क्लबची विशेष शाखाही कार्यरत आहे. ज्या महिला उद्योजिकांना या संस्थात्मक चळवळीचा भाग बनून व्यवसायवृद्धी करायची आहे, त्यांनी येत्या १५ फेब्रुवारी होणाऱ्या महिला विशेष बैठकीला उपस्थित राहावे, तसेच हळदीकुंकू समारंभामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहिती आणि कार्यक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी मानसी महागावकर (9890991407) किंवा गीता भागवत (8275433735) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button