*वसई-भाईंदर फेरीबोट सेवेचा १६ रोजी शुभारंभ*______
वसई ते भाईंदर वेळेतील रस्ते मार्गाने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु येथील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. वसई ते भाईंदरदरम्यान वसई खाडीमध्ये सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. च्या फेरीबोट सेवेचा दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. राज्य शासनातर्फे शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी दिली.कोकचा पर्यटनातून विकास करण्यासाठी सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.तर्फे दाभोळ-धोपावे, जयगड-तवसाळ, वेश्वी-बाग मांडले, परचुरी-फरारे या ठिकाणी पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांसाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवेमुळे कोकणातील सर्व पर्यटन स्थळे जवळ आली आहेत. तसेच वेळ आणि पैशांची बचत होते. त्यामुळे बहुतांशी पर्यटक या फेरीबोट सेवेचा लाभ घेवून प्रवास करताना दिसतात. समुद्र किनार्यांचा विकास आणि जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून वसई खाडीमध्ये वसई-भाईंदर अशी फेरीबोट सेवा राज्य शासनातर्फे सुरू करण्यात येत आहे. www.konkantoday.com