*राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी व उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांचा राजीनामा*
_राजापूर अर्बन बँकेवरील सत्ताधारी सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे आपली एक वर्षाची मुदत संपताच बँकेचे विद्यमान अध्यक्ष हनिफ मुसा काझी व उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या दोघांचेही राजीनामे मंजूर झाले असून पुढील अध्यक्ष व उपाध्यक्षपपदासाठी बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.पुढील एक वर्षासाठी सत्ताधारी सर्वपक्षीय सहकार पॅनेलने निश्चित केल्याप्रमाणे अध्यक्षपदी संचालिका सौ. अनामिका जाधव यांची तर उपाध्यक्षपदी विवेक गादीकर यांची निवड होणार आहे.www.konkantoday.com