*भास्कर जाधवांना ही शेवटची वॉर्निंग,राणे कुटुंबीयावरील टीका सहन करणार नाही, -माजी खासदार निलेश राणे*
_भास्कर जाधवांना ही शेवटची वॉर्निंग,राणे कुटुंबीयावरील टीका सहन करणार नाही,.असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिला आहे’मी राजकारणात लढण्यासाठी आलो नाही. मला जनतेने स्वीकारले नाही तरी चालेल आणि माझा पुन्हा एकदा पराभव झाला तरी चालेल. पण राणे कुटुंबीयावरील टीका सहन करणार नाही, असा इशाराही माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना दिला आहे.माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरेंच्या ठिकठिकाणी सभा झाल्या. पण उद्धव ठाकरेंच्या कणकवलीतील सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर मर्यादा ओलांडून टीका केली.निलेश राणे म्हणाले, राजकीय व्यासपीठावरून टीका करताना काही मर्यादा पाळून बोलायचे असते. खालच्या पातळीवर उतरून व्यक्तिगत टीका करणे योग्य नसते. पण कणकवलीच्या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर मर्यादा ओलांडून टीका केली. त्यामुळे भास्कर जाधवांना ही शेवटची वॉर्निंग आहे”, असा इशाराही निलेश राणेंनी दिला आहे.निलेश राणे म्हणाले, “यापूर्वी आम्ही केवळ फक्त एकदाच उद्धव ठाकरे यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली होती. पण त्यावेळी संजय राऊत यांनी देखील आमच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर मर्यादा ओलांडून टीका केली होती. अन्यथा आम्ही मर्यादा सोडली नव्हती. पण सोमवारी भास्कर जाधव येथे राणे कुटुंबीयांवर मर्यादा ओलांडून टीका केली आहे. आता 16 फेब्रुवारीला गुहागर येथे सभा घेणार आहे. भास्कर जाधवांचा ठाकरे कुटुंबावर टीका करतानाचा व्हिडीओ निलेश राणेंनी पत्रकार परिषदेत दाखवली. आता भास्कर जाधव यांना राजकारणातून संन्यास घेतील का? असा प्रश्न पडला.”www.konkantoday.com