*राजापूर रेल्वेस्टेशनवरील रिक्षा स्टँडकडे दुर्लक्ष, कोकण रेल्वे प्रशासनाकडून अंमलबजावणी नाही*
__कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्टेशनवर ऑटो रिक्षाच्या पार्किंगची व्यवस्था आधीच उपलब्ध असताना राजापूर रेल्वेस्थानकावर कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे रिक्षा व्यावसायिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर रिक्षा पार्किंगची व्यवस्था नसल्याने काही व्यावसायिकांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. दरम्यान राजापूर तालुका रिक्षा संघटना रेल्वेस्टेशन राजापूरच्यावतीने रिक्षा स्टँड मिळावा म्हणून निवेदनामार्फत मागणी केली आहे. www.konkantoday.com