*मत्स्यगंधातून तेवीस लाखांचा ऐवज लंपास*
__कोकण मार्गावरून धावणार्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या महिलेच्या पर्समधील ४५ हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा २२ लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. या घटनेने खळबळ उडाली असून रेल्वेगाड्यांतील वाढत्या चोर्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत रमा सुरेश मांडा (रा. वाशी-नवी मुंबई) यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.www.konkantoday.com