*जिल्हा प्रशासनाच्यावतीने गोगटे-जोगळेकरला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार प्रदान*
__जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार गोगटे-जोगळैकर महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला.नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होवून मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, लोकशाहीप्रती त्यांच्या मनात आस्था निर्माण व्हावी, त्यांच्यात लोकशाही मूल्ये रूजावीत या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी जनजागृतीविषयक विविध उपक्रम राबविले जातात. या आधीही राज्यशास्त्र विभागाकडून नवमतदार नोंदणी अभिनयाचे आयोजन केले जात होते. प्रा.निलेश पाटील यांनी सन २०१७ मध्ये विभागात रूजू झाल्यानंतर त्यांनी हीच परंपरा अखंडीतपणे सुरू ठेवली. विशेष म्हणजे नंतरच्या काळात जिल्हाधिकार तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कायालय, महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी, जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आतापर्यंत महाविद्यालयात नवमतदार नोंदणी अभिरूप मतदान कार्यक्रम, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धा, मतदार जनजागृतीपर कार्यशाळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमात सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे यांच्या जिल्हा दौर्यानिमित्त आयोजित सामर्थ्य मताचे युवा मतदारांशी एक विधायक सुसंवाद हा परिसंवाद कार्यक्रम विशेष उल्लेखनीय कौतुकास्पद ठरला.सदर पुरस्कार महाविद्यालयाला मिळाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी प्रा.निलेश पाटील, राज्यशास्त्र विभागाचे विशेष अभिनंदन केले.www.konkantoday.com