*दिल्लीत ६,७ रोजी होणार असाक्षरांचा राष्ट्रीय मेळावा, रत्नागिरीच्या अनन्या चव्हाणला विशेष निमंत्रण*

__उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ६ व ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत असाक्षर व नवसाक्षरांचा राष्ट्रीय मेळावा होणार आहे.केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयाने याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय पातळीवर शिक्षण प्रेरणा देणा-या कलाकृतीची दखल घेतलेल्या रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण व तिच्या पालकांना केंद्र शासनाने विशेष निमंत्रण दिले आहे.२०२२ ते २७ या पंचवार्षिक कालावधीत दरवर्षी एक कोटी प्रमाणे पाच कोटी लोकांना साक्षर करण्याचे या योजनेअंतर्गत उद्दिष्ट आहे. देशभरातील 30 घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रातिनिधिक असाक्षर आणि नवसाक्षर स्वयंसेवी शिक्षकांसह नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवनात होणाऱ्या या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button