जेलरोड नाका येथे रिक्षा चालकाचे प्रवासी युवतीशी अयोग्य वर्तन; गुन्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी*
रत्नागिरी शहरातील जेल रोड येथे प्रवासी तरुणीशी अयोग्य वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला डी. बी पथकाने अटक केली. ही घटना गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.13 वा. घडली होती.अब्दुल रेहमान दिलावर मुजावर (39, मूळ रा. मिरज सध्या रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी ) गुरुवारी दुपारी पीडिता तिच्या मैत्रिणीसह संशयित आरोपीच्या रिक्षातून गोडबोले स्टॉप तेजेल रोड अशी शेअर रिक्षाने आली. जेलरोड येथे त्या दोघीही रिक्षातून उतरत असताना संशयित रिक्षा चालकाने पीडितेशी अयोग्य वर्तन केले. याप्रकरणी पीडितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर डी. बी. पाथकाने संशयित रिक्षा चालकाला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.www.konkantoday.com