सिंधुदुर्ग जिल्ह्यात 40 ठिकाणी कृत्रिम भित्तीका उभारणार*
*___माशाच्या मत्स्योत्पादनाच्या अभ्यासामध्ये 65 ठळक मत्स्यजातींपैकी 35 मत्स्यजातींचे मत्स्योत्पादन शून्य झाले आहे. त्यामुळे मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन आणि मत्स्य प्रजातींचे संरक्षण काळाची गरज आहे.यासाठी मानवनिर्मित साहित्य वापरून समुद्रात स्थानिक मच्छीमारांच्या संमतीने मत्स्य विभागातर्फे जिल्ह्यात कृत्रिम भित्तिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 40 ठिकाणी कृत्रिम भित्तिका उभारण्यात येणार आहेत. मासळी उत्पादनात वाढ,आपत्ती व्यवस्थापन किनारपट्टी संरक्षण, मासे पकडण्याची प्रक्रिया व्यवस्थित करणे आणि वाढवणे अशा विविध गोष्टींसाठी कृत्रिम भित्तिकांची मदत होणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्रीधर अलगिरी यांनी सांगितले.मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातींचे संरक्षण ही काळाची गरज लक्षात घेता मत्स्य व्यवसाय विभाग मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मासळी उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी देवगड पवनचक्की ,जीप लाईन शेजारील खोल समुद्रामध्ये कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या. याचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त श्रीधर अलगिरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती कार्यालय मत्स्य विभाग बाहर महाकाल, मत्स्य परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर ,द्विजकांत कोयंडे, चंद्रकांत पाळेकर,लक्ष्मण तारी, विनायक प्रभू,सागर मित्र सहारा गावकर,अक्षय महाडिक तसेच रापण संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com