उपद्रवी वन्यजीवांची शिकार योग्य ठरवण्याची गरज-ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ*
माधवराव गाडगीळकोकणासह संपूर्ण देशभरात वाढलेल्या वानर, डुक्कर या वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे सारे शेतकरी हतबल झालेले आहेत. भारतात अशा उपद्रवी वन्यप्राण्यांची शिकार सन १९७२ पर्यंत मोठ्या प्रमाणात चालू होती. मात्र शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणून ती शिकार अचानक थांबवली त्याचे परिणाम आज या उपद्रवामुळे समोर येत आहेत. त्यासाठी या कायद्याचा अभ्यास करून शिकार करणे योग्य आहे. हे ठरविण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.रत्नागिरीत सध्या वानरांच्या उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी येथील बागायतदार शेतकरी अविनाश काळे यांनी आंदोलनही केले पण त्याच्या मागणीकडे प्रशासन, शासनस्तरावरून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबत पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांनी बुधवारी येथील पत्रकारांशी समाजमाध्यमाद्वारे ऑनलाईन संवाद साधला.www.konkantoday.com