अटकेतील त्या दोघांच्या घरांचीही झाडाझडती*
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे काळकाई मंदिरासमोर खवले मांजराला तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने गजाआड केलेल्या रायगड जिल्ह्यातील त्या २ संशयितांच्या घरांची गुरूवारी दिवसभर झाडाझडती घेतली. दापोली परिक्षेत्र वनाधिकारी पी.जी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाचा दिवसभर महाडमध्येच तळ कायम होता. खवले मांजर तस्करी प्रकरणी मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने वनविभागाकडून कसून तपास करण्यात येत आहे.खवले मांजर तस्करीप्रकरणी आतिश अशोक सोनावणे (तुळशी बुद्रूक बौद्धवाडी) याच्या वनविभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्यानंतर सखोल तपासाअंती आणखी दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार वनविभागाने तुळशी बुद्रूक खिंडीजवळ रचलेल्या सापळ्यात अनिल धोंडीराम जाधव (रा. नागाव-मडाड, जि. रायगड), राजंंेंद्र रघुनाथ मोरे (रा. दिवीळ-पोलादपूर, जि. रायगड) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. खवले मांजर तस्करी प्रकरणी अटकेतील तिघांचीही २ दिवस वनविभागाच्या कोठडीत रवानगी केली होती. www.konkantoday.com