व्यवसायिक गॅसच्या किमतींत वाढ, आजपासून नवीन दर लागू
१ फेब्रुवारीच्या पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. देशाच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर वाढवून ग्राहकांचे बजेट बिघडवले आहे.हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींवर परिणाम झाल्याने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १.५० रुपयांनी वाढवल्या होत्या
www.konkantoday.com