उलटीची तस्करी करणारे दापोलीतील दोघेजण ताब्यात*
कर्नाटक गुलबार्ग येथे व्हेल माशाची उलटीची तस्करी करणार्या दापोली येथील चौघांच्या पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या. कर्नाटक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरी येथून ही उलटी कर्नाटक येथे घेवून गेल्याची शक्यता कर्नाटक पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे.माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी गुलबर्गा गांजीपूर पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांकडून या ठिकाणी सापळा रचण्यात आला.बनावट गिर्हाईक पाठवून पोलिसांनी या चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दापोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी ही उलटी ताब्यात घेतली असून तिच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.www.konkantoday.com