*भरणेत खवले मांजर तस्करी प्रकरणी एकास अटक
_______मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोर खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी मंगळवारी येथील वन विभागाने एकास जेरबंद केले.अतिष अशोक सोनावणे (४२) तुळशी बुद्रुक बौद्धवाडी, असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे.भरणे येथील काळकाई देवी मंदिर येथे एक व्यक्ती खवले मांजराची खवले घेवून विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच वन विभागाने सापळा रचला, त्यानुसार भरणे येथील काळकाई मंदिराजवळ एक व्यक्ती निळी-काळी रंगाची बॅग घेवून संशयितरित्या फिरत असल्याचे निदर्शनास फिरत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संशयिताची कसून तपासणी केली असता त्याच्या बॅगेत नायलॉन पिशवीमध्ये दीड किलो वजनाचे खवले मांजर आढळले.www.konkantoday.com