दापोली तालुक्यातील वेळवी परिसरात आज भर दुपारी वणवा लागल्याने वनसंपदेची अपरिमीत हानी
_दापोली तालुक्यातील वेळवी परिसरात आज दि.३० जानेवारी रोजी भर दुपारी वणवा लागल्याने वनसंपदेची अपरिमीत हानी झाली आहे.अनेको वृक्ष आणि माळरान बेचिराख झाले आहे या वणव्यामुळे निसर्गसाखळी तुटून निसर्गचक्रावर विपरित परिणाम होतो. असे वारंवार लागणारे वणवे थांबवण्यासाठी वणवा मुक्त गाव संकल्पना आमलात आणणे आवश्यक असल्याचे मत निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत परांजपे यानी व्यक्त केले www.konkantoday.com