- ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यावेळी टॉप ५ स्पर्धकांमध्ये मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण या स्पर्धकांनी धडक मारली होती. अखेर अटीतटीचाच्या लढाईत प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत शेवटी मुनव्वर फारुकीने विजेतेपदावर नाव कोरलं आहे.’बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून मुनव्वर विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. संपूर्ण सीझन त्याने उत्तम कामगिरी केली होती. ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता. या सगळ्या संकटांवर मात करत त्याने विजेतेपदावर नाव कोरलं आहे. याआधी मुनव्वर कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोचाही विजेता ठरला होता.एका वादग्रस्त स्टँड-अप ॲक्टमुळे मुनव्वर चर्चेत आला आणि हळूहळू एक स्टँड-अप कॉमेडीयन म्हणून लोकप्रिय झाला. गुजरातच्या जुनागढजवळील एका छोट्याशा गावातून आलेल्या मुनव्वरला या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. मध्यंतरी ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनव्वरने त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बरेच खुलासे केले होते.वडिलांच्या कर्जामुळे लहान वयातच मुनव्वरवर शिक्षण सोडून काम करायची वेळ आली. मुनव्वरची आई आणि आजी समोसे उत्तम बनवायच्या अन् मुनव्वर स्वतः एक स्टॉल लावून ते समोसे विकायचा, समोसे तळताना बऱ्याचदा मुनव्वरची बोटं भाजायची, पण त्याचा हा व्यवसाय चांगला चालला. त्यानंतर मुंबईत आल्यावरही मुनव्वरने एका गिफ्ट शॉपमध्ये तसेच एका भाड्यांच्या दुकानात अगदी पडेल ते काम केलं.www.konkantoday com
Back to top button