क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना घेऊन निघालेल्या पिकअपची रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडक,एकजण गंभीर जखमी
क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना घेऊन निघालेल्या पिकअपची रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्यामुळे अपघात होण्याची घटना घडली आहे
खेडतालुक्यातील हेदली गावानजीक खेड-खोपी मार्गावर रविवारी क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना घेऊन निघालेल्या पिकअपची रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडक बसली आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी असून पाचजण किरकोळ जखमी आहेत.
खेड-खोपी मार्गावर रविवारी दि. २८ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडीतून (एमएच ०८ एपी ५४९१) मध्ये १५ तरुण – क्रिकेट खेळण्यासाठी जात असताना हेदली या ठिकाणी जाताना पिकअप चालकाचे नियंत्रण सुटून तो डंपर (एमएच ०९ आयपी ९५८१) वर धडकला. या अपघातात अथर्व अजित जाधव (१४), राज दिलीप बुरटे (१४), सोहम प्रदीप बुरटे (१७), यश दिनेश बुरटे (१७), दिनेश दिलीप कानेकर (३२) हे जखमी झाले. अपघातानंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
www.konkantoday.com