१५६४ कोटींचा खर्च तरीही चौपदरीकरण**अजूनही अपुरेच*_

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाबाबत एकीकडे राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चौपदरीकरण पूर्णत्वास जाईल, असे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगत आहे तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात कोलाड-नागोठणेदरम्यानचे काम संथगतीने सुरू असून नवीन बांधकामालाही तडे गेले आहेत. महिसदरा नदीवरील पुलाचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे रायगडमधील अपूर्ण कामे लक्षात घेता वर्षभरात महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होणे कठीण दिसत आहे.आतापर्यंत महामार्गावर पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या ८४ किमी चौपदरीकरणावर १५६४ कोटी रुपये खर्च करूनही कामे अपूर्णावस्थेतच असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महामार्ग चौपदरीकरणाबाबत खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र त्या फोल ठरल्या आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button