श्वानांचा पाठलाग करत चक्क बिबट्या राजापूर पाेलिस स्थानकात
श्वानांचा पाठलाग करत चक्क बिबट्या राजापूर पाेलिस स्थानकात शिरल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. या बिबट्याने एका श्वानाला उचलून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.तहसील कार्यालय व पाेलिस स्थानकाच्या व्हरांड्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहून पाेलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राजापूर पाेलिस स्थानकाच्या आवारात बुधवारी रात्री श्वान फिरत हाेते. या श्वानांचा पाठलाग करत बिबट्या अचानक पाेलिस स्थानकाच्या मागील बाजूने आत शिरला. सुरुवातीला ताे बिथरला आजूबाजूला कुणी नसल्याचा अंदाज घेऊन ताे पुढे सरकला. बिबट्या येताच श्वानांनी पळ काढला, त्यातील एक श्वान थेट पाेलिस स्थानकातच शिरले. बिबट्याने पाेलिस स्थानकात शिरून एका श्वानाला पकडले. या श्वानाला पकडून बिबट्या तुरुंगाच्या दिशेने असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने पसार झाला. हा संपूर्ण प्रकार पाेलिस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
www.konkantoday.com