चार लाखाच्या कर्जापोटी २२ लाखांची वसुली
व्यवसायासाठी ३ लाख ९० हजार रूपयांचे दोन टप्प्यात घेतलेले कर्ज फेडताना खेर्डीतील अनधिकृत सावकाराने २२ लाखांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार डिसेंबर महिन्यात येथे घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून सावकाराला अटक व जामिनावर सुटका झाली असली तरी पोलिसांकडून ठोस कारवाई आणि चौकशी केली जात नाही. त्यामुळे न्याय न मिळाल्यास पोलीस स्थानकासमोर २६ जानेवारीस उपोषण अथवा आत्मदहनासारखी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा अलोरे येथील पीडित तरूणी उज्मा सिद्दीक मुल्लाजी हिने मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
www.konkantoday.com