उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 करिता कोकण विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांची निवड
*रत्नागिरी, दि. 22 : यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिन 2024 या कार्यक्रमामध्ये राज्यातील उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 करिता मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग (SVEEP) उपक्रम राबवून मतदार यादी दुरुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कोकण विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, तसेच जीवन देसाई, मतदार नोंदणी अधिकारी 266- तथा उपविभागीय अधिकारी यांचीही उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आलेली आहे.
तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी 2024 करिता कोकण विभागातून आकाश लिगाडे, मतदार नोंदणी अधिकारी 265- चिपळूण तथा उपविभागीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार 2024 यामध्ये समाजमाध्यमांद्वारे उत्कृष्ट प्रचार प्रसिध्दी करिता राज्यामध्ये
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्यासाठी
समाजमाध्यम समन्वयक वैभव विजय आंबेरकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
पारितोषिक वितरण समारंभ दि.24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जयहिंद कॉलेज, चर्चगेट, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 25 जानेवारी, 2024 रोजी 14 वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये सन 2023-24 या वर्षभराच्या कालावधीमध्ये मुख्य निवडणूक
अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवडणूक विषयासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरीच्या आधारे राज्यातील
अधिकाऱ्यांची संस्थांची तसेच व्यक्तींची राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पारितोषिक व सत्कारासाठी राज्यस्तरावरुन निवड करण्यात
आलेली आहे.
000