संंगमेश्वर तालुक्यातीलबोंड्ये येथे भीषण आगीत घर जळून खाक
संंगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये सुतारवाडीतील विजय दगडू पांचाळ यांच्या घराला आज (दि.१९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी घरात कोणीही नव्हते. आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून अंदाजे ९ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
www.konkantoday.com