रत्नागिरी जिल्हा बँकेची युपीआयद्वारे डीजीटल बँकिंगमध्ये गरूडझेप
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध प्रकारच्या डिजीटल बँकींग क्षेत्रामध्ये असलेल्या सुविधा आपल्या ग्राहकांसाठी यापुर्वीच सुरू केल्या आहेत. बँकेने दि.१७ जानेवारी २०२४ रोजी बँकेच्या संचालक मंडळ सभेचे औचित्य साधून युपीआय Unified Payment Interface ही ऑनलाईन सेवा कार्यान्वित करून डीजीटल बँकिंगमध्ये गरूडझेप घेतली आहे. या सुविधेचे अनावरण बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव व सर्व सन्मा. संचालक महोदय तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजय चव्हाण व सरव्यवस्थापक डॉ.सुधिर गिम्हवणेकर यांच्या उपस्थितीत करणेत आले.
या सुविधेमुळे बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या ाात्यामध्ये रक्कम जमा करणे अथवा आदा करणे जलदगतीने करता येणे शक्य होणार आहे. बँकेचे ग्राहक आपल्या मोबाईलद्वारे रक्कम ाात्यामध्ये जमा करू शकतात अथवा आदा करू शकतात. बाजारपेठेतील मोठे व्यावसायिक, व्यापारी, भाजी फळे विक्रेते हे देाील या सुविधेचा लाभ घेवून आपले दैनंदिन व्यवहार विनासायास रत्नागिरी जिल्हा बँकेमार्फत पार पाडू शकणार आहेत. बँकेचे ग्राहक वेगवेगळ्याा प्रकारची बिले जसे की टेलिफोन बील, मोबाईल रिचार्ज, वीजबील, रेल्वे बुकिंग इ. सुविधांचा लाभ घरबसल्या घेवू शकतात. सदर सुविधा २४ ७ उपलब्ध राहणार आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना डीजीटल तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा मोबाईल ऍप, आरटीजीएस, एनईएफटी, पॉस ट्रॅन्झॅक्शन, ईकॉम, एसएमएस ऍलर्ट, सीटीएस इ.सेवा उपलब्ध करून देणेत आलेल्या आहेत.
बँकेचे ठेवीदार, कर्जदार व ग्राहक यांचे सहकार्याने बदलत्या काळानुसार बँकेने डीजीटल बँकिंगमध्ये व आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे. दि. ३१.१२.२०२३ ओर बँकेंच्या ठेवी रू.२३५८ कोटी असून कर्जव्यवहार रू.१७६० कोटी आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रू.४११८ कोटी एवढा आहे. बँक कायम शेतकरी केंद्रबिंदू मानून आंबा बागायत, दुभती जनावरे इ. शेती व्यवसायाकरीता अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करीत आहे. त्याचबरोबर ोटे-मोठे व्यावसायिक यांचेकरीता सुध्दा बँकेकडून सुलभ कर्जव्यवहार होणेचेदृष्टीने धोरण राबविले जात आहे. दि.३१.१२.२०२३ ओर बँकेला रू.५४ कोटी एवढा नफा झालेला आहे. सन २०२२-२३ करीता बँकेने आपल्या सभासदांना १५% एवढा लाभांश दिलेला आहे. बॅकेचा नक्त एनपीए गेली सतत ११ वर्षे ० टक्के असून ऑडीट वर्ग गेली सतत १२ वर्षे अ आहे. बँकेच्या १९ शाखांमध्ये एटीएम सुविधा सुरू असून तीन मोबाईल एटीएम व्हॅन कार्यान्वित आहेत. त्याचबरोबर बँकेने शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाकरीता तसेच नैसर्गिक आपद्ग्रस्तांना नेहमीच आर्थिक मदतीचा हात पुढे केलेला आहे.
बँक करीत असलेल्या आर्थिक प्रगतीमुळेच बँकेला वेगवेगळ्याा संस्थाद्वारे १७ विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी शासनाकडून सहकार निष्ठ व सहकार भूषण असे दोन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याशिवाय बेस्ट चेअरमन म्हणून बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांना दोन वेळेस सन्मानित करणेत आलेले आहे. बँकेच्या नविन युपीआय सेवेचा व इतर डीजीटल सेवांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे बँकेमार्फत आवाहन करणेत आले आहे. www.konkantoday.com