10 व 11 फेब्रुवारी रोजी ‘ग्रंथोत्सव-‘
*रत्नागिरी, दि. 17 : ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी, या हेतून राज्यशासनातर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यामार्फत दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी 10 व 11 फेब्रुवारी रोजी शासकीय मध्यवर्ती विभागीय ग्रंथालय येथे ग्रंथोत्सव 2023 होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी दिपक झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजनाबाबत बैठक झाली. बैठकीला कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय सचिव माधव अंकलगे, अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मदन हजेरी, प्रशासन अधिकारी अरुणा केतकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट, प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे, ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे आदी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी सकाळी 8 ते 10 वा. ग्रंथ दिंडी, 11 ते 1 वा. पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन, दुपारी 2.30 ते 5 वा. चर्चासत्र. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते 12.30 वा. स्पर्धा पररीक्षेविषयक मार्गदर्शन, दुपारी 2 ते 3 वा. ग्रंथ आणि परिवर्तन यावर मार्गदर्शन आणि दुपारी 3 ते 5 वा. काव्यवाचन व ग्रंथोत्सवाचा समारोप असे नियोजन असणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे, वक्ते, जिल्ह्यातील साहित्यिक, नवकवी, विचारवंत यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com