देवरूखातील डीकॅडचा माजी विद्यार्थी अयोध्येतरेखाटतोय श्रीरामाचे जीवन
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा उदघाटन सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अयोध्या येथे प्रत्यक्ष चित्र रेखाटन कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातून वीस चित्रकारांची निवड झाली आहे.
या चित्रकारांमध्ये देवरूखातील डीकॅड कला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कुडाळ तालुक्यातील नेरूर माड्याचीवाडी येथील युवा चित्रकार महादेव बाळकृष्ण गावडे याची निवड झाली आहे.
रामायण संदर्भात तसेच प्रभू श्रीराम आणि त्यांचे जीवन यासंबंधीची चित्रे रेखाटली जाणार आहेत. अयोध्येत प्रत्यक्ष चित्रण केले जाणार आहे. सध्या महादेव गावडे अयोध्येत आहेत. क्रेडारचे अध्यक्ष अजय पित्रे, भारती पित्रे, सेक्रेटरी वीरकर, डीकॅडचे प्राचार्य रणजित मराठे यांनी महादेवचे कौतूक केले आहे. www.konkantoday.com