चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील समर्थ नगर परिसरातीलअनधिकृत भंगार कारखान्याची भिंत जैसे थे
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील समर्थ नगर परिसरातील अनधिकृत भंगार कारखान्याच्या संरक्षक भिंतीमुळे पावसाचे पाणी थेट घरात घुसत असल्याची तक्रार जगदीश तुकाराम इंदुलकर यांनी तहसिलदारांकडे केली होती. यातून न्याय मिळावा यासाठी १५ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषणाचा इशाराही दिला होता. या इशार्यानंतर महसूल विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या पंचनाम्यात सदरची भिंत तोडून पाच फूट आत घेण्याची लेखी कबुली कारखान्याचे मालक अफताब कच्छी यांनी दिल्याने दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र या पंचनाम्याला केराची टोपली दाखवत कारखानदाराने त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने तक्रारदार इंदुलकर आक्रमक झाले असून त्यांनी प्रजासत्ताक दिनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दहसिलदार प्रवीण लोकरे यांना दिला आहे.
www.konkantoday.com