फरशीतीठा येथील वाहतुकीचा गुंता सुटला
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामामुळे फरशीतीठा येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यामुळे वाहनांच्या तासन तास रांगा लागत होत्या. मात्र कंत्राटदार कंपनीने या परिसरातील भुयारी मार्ग आणि एकेरी लेन वाहतुकीसाठी खुली केल्याने वाहतुकीचा गुंता सुटला आहे. यामुळे परशुराम घाटातून होणारी वाहतूकही सध्या सुरळीत झाली आहे. येथे वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागला असला तरी नव्या मार्गावर एसटी बस थांबा उपलब्ध नसल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गैयसोय होत आहे.
www.konkantoday.com