
टेरव येथील लिंगेश्वर मंदिर देवस्थानला क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला
चिपळूण तालुक्यातील टेरव येथील लिंगेश्वर मंदिर देवस्थानला क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्याने स्वयंभू असलेल्या या निसर्गरम्य वातावरणातील मंदिराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. याशिवाय तालुक्यातील पोफळी येथील महाकाली मंदिराचाही क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र यादीत समावेश करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीत टेरव येथील लिंगेश्वर मंदिर देवस्थान, मौजे पोफळी येथील महाकाली मंदिर रत्नागिरी तालुक्यातील विल्ये येथील श्री सोमेश्वर व वाघजाई मंदिर, डोर्ले येथील श्री स्थानेश्वर मंदिरास क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र, यात्रास्थळाचा दर्जा मिळाला आहे. टेरव येथील लिंगेश्वर मंदिर सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून ते स्वयंभू आहे.
www.konkantoday.com