देवरूखात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू
देवरूख नगर पंचायतीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केव्हा सुरू होार, याकडे तमाम नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. प्रत्यक्षात १ जानेवारीपासून घनकचरा प्रकल्प सुरू झाल्याने विविध चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत देखील तयार करण्यास प्रारंभ झाला आहे.
देवरूख शहराचा विकास झपाट्याने होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर कचराही मोठ्या प्रमाणात जमा होतो. हा कचरा देवरूख न.प.च्या घंटागाडीच्या माध्यमातून एकत्र केला जातो. जमा होणारा कचरा यापूर्वी कावलटेक येथे टाकला जात होता. मात्र जवळच पाण्याची टाकी असल्याने तसेच हा कचरा जनावरे, कुत्री विस्कटत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. कचरा टाकण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी, कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभा करण्यासाठी कांजिवरा येथे कोट्यावधी रुपये खर्च करून जागा खरेदी करण्यात आली. www.konkantoday.com