
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव- वाणेवाडी येथील महिलेचे बंद घर चोरट्याने फोडून केली १ लाख ४७ हजार रुपयांची चोरी
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव- वाणेवाडी येथील महिलेचे बंद घर चोरट्याने फोडून १ लाख ४७ हजार रुपयांची चोरी केली. देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (ता. ३) सकाळी साडेसात ते सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कोंडगाव-वाणेवाडी येथे घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजया विजय जठार या बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप धारदार हत्याराने कापून घरात प्रवेश केला हॉलमधील सोफ्यातील बॅगेमधून १ लाख १० हजाराचे किमतीचे ४ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३७ हजार रुपये रोकड असा एकूण १ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी पळवला. या प्रकरणी विजया जठार यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com