चिपळुणात गाळ साठा नियमावली शिथिल
जलसंपदा विभागातर्फे चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाला सुरूवात झाली असून यासाठी ४ कोटी ८५ लाखांचा निधी प्राप्त झघला आहे. हा निधी फक्त गाळ उपशासाठीच्या पोकलॅन डिझेलवरच खर्च केला जाणार आहे. तसेच उपसलेल्या गाळाच्या साठ्याबाबतही नियमावली शिथिल करण्यात आली आहे. यामुळे शहरातील नदी, नाले पात्राशेजारी क्षेत्र वगळून उपसलेला गाळ कुणालाही कुठेही नेता येणार आहे. सोमवारी शहरातील प्रांत कार्यालयात आमदार शेखर निकम, बचाव समिती आणि प्रशासन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. www.konkantoday.com