बनावट Instagram अकाऊंट बनवून त्यावर तरुणीचे अश्लील बनावट फोटो तयार करून धमकी देणाऱ्या पुणे येथील तरुणाला दापोली पोलिसांनी केली अटक


सोशल मिडिया वरील वावर असणाऱ्या तरुणांमध्ये Instagram हे जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या अॅप पैकी एक आहे. दिनांक 11/09/2023 रोजी, दापोली पोलीस ठाणे येथे राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या Instagram अकाऊंट वर एक Friend request आल्याने व Friend request मधील व्यक्ति ही आपलीच मैत्रीण असल्याने तिने लगेच ती स्वीकारली. काही वेळातच दोघांमध्ये संदेशांची देवाणघेवाण ही झाली.
याच Instagram अकाऊंट वरून तिला थोड्या वेळाने एक व्हिडिओ कॉल आला व या कॉल मध्ये एक अज्ञात इसम आपला चेहरा न दाखवता, अर्धनग्न शरीर दाखवत अश्लील चाळे करून दाखवत असल्याचे दिसले.
थोड्याच वेळात याच Instagram अकाऊंट वरून या तरुणीचे तसेच या अज्ञात व्यक्तीचे बनावट फोटो (Morphed Photo) तिला व तिच्या इतर Instagram वरील मित्र मैत्रिणींना पाठविण्यात आले व सर्व बनावट फोटो इंटरनेट वर व्हायरल करण्याबाबत धमकावण्यात ही आले.
या तरुणीने वर घडलेला प्रकाराबाबत आपल्या मैत्रिणीच्या मोबाइल नंबर वर कॉल केले असता तिला लक्षात आले की आपली मोठी फसवणूक झालेली आहे व सदरचे Instagram अकाऊंट हे बनावट अकाऊंट आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दापोली पोलीस ठाणे येथे या तरुणीने या अज्ञात इसमा विरोधात व बनावट Instagram अकाऊंट बाबत तक्रार दिली.
या तक्रारीची लागलीच दखल घेत दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 170/2023 भा.द.वि.संहिता कलम 354(अ)(1)(3), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 सुधारित 2015 चे कलम 66(C), 67(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व याचा तपास दापोली पोलीस ठाणे पथकामार्फत व सायबर पोलीस ठाणे मार्फत तांत्रिक तपास सुरू करण्यात आला.
सदरचा गुन्हा हा सायबर पोलीस ठाणे यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उघडकीस आलेला आहे तसेच या गुन्ह्यामधील आरोपी रमेश भागोजी कोरके, वय 32 वर्ष रा. कोरकेवाडी कोलतावडे, ता. आंबेगाव जिल्हा पुणे, याला दापोली पोलीसांमार्फत आज रोजी ताब्यात घेण्यात आलेले आहे व या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र मुणगेकर यांचे योग्य सूचनेनुसार सदरची कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
1) पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे, दापोली पोलीस ठाणे,
2) पोलीस उप निरीक्षक श्रीमती. ज्योति चव्हाण,
3) पो.हवा/१२५३ श्री. शिवलकर व
4) पो.कॉ /९८२ श्री. सातार्डेकर.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button